नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड-१९ तपासणीसाठी केंद्रांची मान्यता मिळाली आहे.
कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज, अंबाजोगाईतलं स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालय, तसंच बारामती, गोंदिया आणि जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह ; नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा या तपासणी केंद्रांमध्ये समावेश आहे.
या चाचणी केंद्रासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री, साधनं तसंच अन्य बाबी, संबधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार करण्याचे आदेशही दिले आहेत. यामुळे कोरोना तपासणी स्थानिक स्तरावर करणं शक्य होणार आहे, या तपासणी केंद्रांची निर्मिती लवकरात लवकर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.