नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्याच्याल्या विक्रमगड तालुक्यातल्या म्हसरोली या गावात पाच ते सहा वर्षापासून खरीपातल्या भातपीकाच्या कापणीनंतर डिसेंबर महिन्यात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. मात्र कोव्हीड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे पिकविलेल्या शेतमालाची विक्री होत नसल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.

म्हसरोली, कुरंझे परीसरातल्या काही भागात मोठ्या प्रमाणात पिकवलेला पांढरा कांदा बाजारपेठ बंद असल्यानं सध्या शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे.