नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई महापालिकांमधल्या झोपडपट्टी भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं या क्षेत्रातल्या झोपडपट्टी भागाकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश केंद्रीय पथकाचे अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांनी महापालिकांना दिले आहेत.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केन्द्रीय पथक ठाणे जिल्ह्यात आलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीनं सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी तसंच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, अशा सुचनाही त्यांनी केल्या.