नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वत्र लॉकडाऊन असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करणं शक्य व्हावं यासाठी होमगार्ड मदत करत आहेत. आय टी कंपन्यांमधून कामकाजासाठी आवश्यक सामग्री कर्मचाऱ्यांच्या घरापर्यंत पोचवायला होमगार्डनी मदत केली आहे.
राज्यात पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि नाशिक मध्ये अनेक आय टी कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून कॉम्पुटर, लॅपटॉप तसेच इतर संबंधित साहित्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोचवायला होमगार्डची बहुमोल मद्त झाल्याचं होम गार्ड आणि नागरी सुरक्षा महासंचालक संजय पांडे यांनी सांगितलं आहे.