पुणे : कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे. 1 मे पासून अन्नधान्य वितरीत करण्याचे नियोजन होते, मात्र पुणे विभागात 25 एप्रिलपासूनच अन्नधान्याचे वाटप सुरू केले असून आतापर्यंत पुणे विभागात 15 टक्के धान्य वाटप झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे शहरात 14 टक्के, पुणे ग्रामीण 6 टक्के, सांगली 40 टक्के, सोलापूर 16 टक्के, कोल्हापूर 25 टक्के तर सातारा जिल्हयात 1 टक्के धान्य वाटप झाले आहे. सातारा जिल्ह्यात गती कमी आहे. एकंदर केशरीकार्डधारकांना धान्य वाटप नियोजनाप्रमाणे 10 मे पुर्वी सर्व अन्नधान्य वाटप करण्याचे नियोजन पुर्ण होईल, अशी खात्री असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.