नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना बाधितांवरच्या उपचारात रॅमडेसेव्हिर या विषाणू प्रतिरोधकाचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कॅलिफोर्नियातल्या एका औषध कंपनीनं जाहीर केलं आहे. तिथल्या एका रूग्णालयात Covid 19 च्या उपचारासाठी हे औषध सध्या प्रायोगिक तत्त्वावर वापरलं जात आहे.
Covid 19 ग्रस्तांना हे औषध 5 दिवस दिल्यानंतर 50 टक्के रुग्ण बरे होऊन दोन आठवड्यात घरी गेले असल्याचं स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या औषध विभागाच्या प्राध्यापिका अरुणा सुब्रमण्यम यांनी सांगितलं.इतर विषाणू प्रतिरोधकांप्रमाणेच हे औषध विषाणूची वाढ आणि प्रजोत्पादनाला मज्जाव करणं.