नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलवरचे कर वाढवायच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसनं टीका केली असून, हा निर्णय मागं घ्यावा, अशी मागणीही केली आहे. गरीब स्थलांतरीत मजूर, कामगार, दुकानदार, छोटे उद्योजक असे सगळेच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत, आणि आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन तेलाच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे, असं असताना सरकार पेट्रोल-डिझेलवरचे कर का वाढवत आहे, असा सवाल काँग्रेस नेते रणदीपसिंग सुर्जेवाला यांनी केला आहे.