नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इथियोपियाचे पंतप्रधान डॉ. अबे अहमद अली यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.
भारत आणि इथियोपिया दरम्यान असलेल्या दृढ संबंधांना आणि दोन्ही देशांमधल्या उत्तम विकासाच्या भागीदारीला पंतप्रधान मोदी यांनी उजाळा दिला.
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या देशांतर्गत, प्रादेशिक आणि जागतिक आव्हानांविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी चर्चा केली. या आरोग्याच्या संकटसमयी, एकमेकांसोबत उभे राहण्याचा विश्वासदोघांनीही व्यक्त केला.
आवश्यक औषधांचा पुरवठा आणि इथियोपियाच्या अर्थव्यवस्थेवर या आरोग्य समस्येमुळे झालेला प्रभाव कमी करण्यासाठी भारताकडून पूर्ण सहकार्य मिळेल, अशी हमी पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.
कोविड-19 च्या या लढाईत, या महामारीवर मात करण्यात इथियोपिया यशस्वी होईल, अशा शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांनी डॉ अली यांना देशवासियांच्या वतीने दिल्या.