नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत बैठक घेणार आहेत. कोविड 19 ची महामारी आणि त्यानंतर लावलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या परिणामांमधून अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीनं या बैठकीत चर्चा होईल.

भारतीय रिझर्व बँकेनं नुकतीच व्याजदरात पाऊण टक्के कपात केली होती,त्याचा फायदा कर्जदारांपर्यंत पोहोचला आहे की नाही, तसंच बँकांची कर्जवसुली कुठवर आली आहे याचा आढावा बैठकीत घेण्यात येईल.