पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात 17 मे 2020 लॉकडॉऊन सुरु आहे. ज्या-ज्या भागात परिस्थितीत नियंत्रणात आल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. अशा भागातील दुय्यम निबंधक कार्यालये, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये व विशेष विवाह कार्यालये पुरेशी खबरदारी घेऊन 18 मे 2020 पासून सुरु होणार असल्याची माहिती जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
ही कार्यालये कार्यान्वित करतांना व त्यापुढील कामकाज करतांना कर्मचारी व नागरिक यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सह जिल्हा निबंधक, पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखाली सर्व 21 कार्यालये दस्त नोंदणीसाठी 18 मे 2020 पासून (सद्यस्थितीत घोषित करण्यात आलेले प्रतिबंधित क्षेत्र व भविष्यात घोषित होणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये तो घोषित कालावधी वगळून) सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
जिल्ह्यात बारामती तालुक्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2, कार्यालय बारामती क्रमांक-1 सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय बारामती क्रमांक-2, शिरुर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय शिरुर व तळेगाव ढमढेरे, दौंड तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय दौंड व केडगाव, भोर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय भोर, वेल्हा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय वेल्हा, इंदापूर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय इंदापूर, जुन्नर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय जुन्नर व नारायणगाव, आंबेगाव तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय आंबेगाव, पुरंदर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय पुरदंर, मुळशी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी 1 (पौड) व मुळशी 2 (हिंजवडी), मावळ तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे व लोणावळा, खेड तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय, खेड 1 (खेड), खेड 2 (चाकण), खेड 3 (खेड) ही कार्यालये सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी दिली आहे.