नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पावसाळा जवळ आल्याचं लक्षात घेऊन खासगी डॉक्टरांबरोबर समन्वय वाढवण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती स्थापन करण्यात आल्याची माहीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आगामी ऋतुबदलाच्या काळात इतरही रोगांच्या साथी पसरण्याची भीती असल्यानं खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरु करावे असं आवाहन राज्यसरकारने केलं आहे. येत्या २ महिन्यांत आरोग्यविभागातली १७ हजार रिक्त पदं भरण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं.