नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासात कोरोना संसर्गाच्या एकूण १ लाख १५ हजार ३६४ नमुन्यांच्या चाचण्या केल्या असल्याची माहिती आईसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.आतापर्यंत अशाप्रकारे एकूण २८ लाख ३४ हजार ७९८ लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत.
दरम्यान, नविन सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळांना कोविड -१९ च्या तपासण्यांसाठी मान्यता देऊन आईसीएमआर या सुविधेचा सातत्यानं विस्तार करत आहे. सध्या सबंध भारतात ५८७ प्रयोगशाळांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं कोविड – १९ च्या तपासण्यांची मान्यता दिली असून यातल्या ४०७ सरकारी तर १८० खाजगी प्रयोगशाळा आहेत.