नवी दिल्ली : राज्यात आतापर्यंत २२ पोलिसांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दोन हजार ९५ पोलिसांना या आजाराचा संसर्ग झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

यामध्ये २३६ अधिकारी, आणि १ हजार ८५९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी सुमारे ९०० रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.