मुंबई (वृत्तसंस्था) : परभणी जिल्ह्यातल्या १२ प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना काल रात्री जुगार खेळतांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विषेश पथकानं ही कारवाई केली.
गंगाखेड रस्त्यानजिक एका बंद दाळ गिरणीच्या आवारात हे सर्वजण जुगार खेळत असल्याचं आढळून आलं.या कारवाईत रोख रक्कमेसह एकूण १२ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.