मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यात २१ मे पर्यंत २ हजार ४१५ कामं सुरु झाली आहेत.
जिल्ह्यात २०-२१ या वर्षात १ एप्रिल पासून २६ हजार ९७९ कुटुंबांना रोजगार मिळाला असून यापैकी २५ हजार १७३ आदिवासी कुटुंब आहेत. त्यामुळे पालघर जिल्हा राज्यात सर्वाधिक आदिवासी कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देणारा जिल्हा ठरला आहे.