मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल संध्याकाळपर्यंत आणखी १ हजार ४३७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या ३६ हजार ७१० झाली आहे.
७१५ रुग्ण काल कोरोना मुक्त होऊन घरी परतले, तर कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १६ हजार ८ झाली. ३८ कोरोनाबाधितांचा काल मृत्यू झाला, त्यामुळे मुंबईतल्या एकूण मृत्युंची संख्या, १ हजार १७३ एवढी झाली.
काल आणखी ८३२ संशयित रुग्ण भर्ती झाले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या सातशे प्रतिबंधित क्षेत्र असून ३ हजार ११० इमारती, कोरोनाबाधित रुग्णं आढळल्यामुळे सील आहेत.