नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात अकोला वनविभागाच्या काटेपूर्णा अभयारण्यात वाघा रोपवाटिकेत तब्बल दीड लाख रोपांचं संगोपन करण्यात आलं आहे. मार्चमध्ये देशात आलेल्या कोरोना महामारीमुळं त्यापूर्वी लावलेल्या रोपांचं संगोपन कसं होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता.
यावेळी वनरक्षक, वनकामगार आणि वनपाल यांनी रोपांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली, लॉकडाऊन काळात मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या नियमांचं पालन करून सर्वांनी काम केलं.
आज ही रोपवाटिका चांगलीच बहरली असून लवकरच या रोपांचं विविध ठिकाणी रोपण करण्यात येणार असल्याची माहिती वनपाल अनिस चाऊस यांनी दिली.