नवी दिल्ली : आयुष पद्धतीला चालना देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. आयुषच्या विविध उपक्रमांना केंद्राकडून वित्तीय सहाय्य दिले जाते. राज्यांमधली रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये औषधांचा पुरवठा आणि पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश आहे. आतापर्यंत 506 जिल्हा रुग्णालयांमध्ये 374 उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आयुष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

जागतिक स्तरावर आयुष पद्धतीला चालना देण्यासाठी 18 देशांसोबत सामंजस्य करार केला आहे. 28 देशांमध्ये आयुष पद्धतीविषयी माहिती देणारे 31 विभाग सुरू करण्यात आले आहेत. आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.