नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या दशकातलं पहिलं, सर्वसाधारण उघड्या डोळ्यांनी दिसू शकणारं सूर्यग्रहण २१ जून रोजी पाहायला  मिळणार आहे. भारतातल्या फक्त उत्तर भागात हे सूर्यग्रहण पूर्ण पहायला मिळेल, तर उर्वरित भागात ते अंशतःदिसेल.

राज्यात सकाळी सुमारे १० वाजता सूर्यग्रहण दिसायला लागेल आणि पावणे अकरा वाजेपर्यंत चालेल. या कालावधीत सूर्याचा अंदाजे ७० टक्के भाग चंद्राने व्यापलेला असेल.

सूर्याचा चंद्राचा कोरलेला भाग सोडल्यास उर्वरित परिघ प्रकाशमान दिसणार असल्यामुळे याचं स्वरुप कंकणाकृती असेल.