नवी दिल्ली : सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार-2020 साठी ऑनलाईन नामांकन पत्रे दाखल करण्याच्या प्रक्रियेची मुदत 15 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवली आहे. सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार हा भारताची एकता आणि अखंडतेसाठी योगदान क्षेत्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. गृह मंत्रालयाच्या https://nationalunityawards.mha.gov.in.या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत.

भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू केला आहे. राष्ट्रीय एकता आणि अखंडतेच्या कार्याला चालना देण्यासाठी आणि बळकट व अखंड भारताचे मूल्य अधिक दृढ करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो.

पुरस्कार खालीलप्रमाणे अलंकृत आहे: