नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५९ पूर्णांक ५१ शतांश टक्के झालं आहे. गेल्या २४ तासांत १९ हजार १४८ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले, त्यामुळे देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ लाख ४ हजार चारशे ६४१ झाली आहे.
५ लाखावरुन पाच दिवसात कोरोनाबाधिताच्या संख्येनं सहा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी ३ लाख ५९ हजार ८६० रुग्ण या आजारातून बरे झाले असून सध्या २ लाख २६ हजार ९४७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. काल दिवसभरात ४३४ जणांचा कोविड १९ मुळे मृत्यू झाला असून देशातल्या मृतांची संख्या १७ हजार ८३४ झाली आहे.
यात सर्वाधिक ८ हजार ५३ रुग्ण महाराष्ट्रातले होते, त्याखालोखाल दिल्लीत २ हजार ८०३, गुजरात १ हजार ८६७, तामीळनाडू १ हजार २६४, तर उत्तर प्रदेशात ७१८ जणांचा मृत्यू कोविड १९ मुळे झाला आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.
राज्यात आतापर्यंत ९३ हजार १५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याखालोखाल दिल्लीत ५९ हजार ९९२, तर तामीळनाडूत ५२ हजार ९२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढत असून, सध्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या १ लाख ३२ हजार ९१२ नं जास्त आहे.