नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखायचं असेल तर मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी करणं आवश्यक आहे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. फडणवीस यांनी आज नवी मुंबई आणि पनवेलचा दौरा केला. त्यानंतर ते बोलत होते.
सध्या अधिक व्हेंटिलेटरची गरज आहे. सरकारची व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया मंद गतीने सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला. मुंबई महानगर क्षेत्रात चाचण्यांची, विलगीकरणाची तसेच उपचाराची व्यवस्था वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
वाशी बाजार समितीमध्ये थर्मल टेस्टिंग वाढविण्याची आणि रॅपिड टेस्टिंगची गरज त्यांनी व्यक्त केली.