Jaipur: Congress leaders Randeep Surjewala, Ajay Maken (L) and Avinash Pandey (R) address the media in Jaipur, Monday, July 13, 2020. (PTI Photo) (PTI13-07-2020_000033B)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमधल्या काँग्रेस आमदारांनी सरकारला आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. हे सगळे आमदार जयपूरमधल्या एका रिसॉर्टमध्ये थांबले असून सचिन पायलट यांच्यासाठी पक्षाची दारं अजुनही उघडीच असल्याचं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. असं असलं तरी आज झालेल्या बैठकीत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा ठरावही मंजुर करण्यात आला आहे.

आज सकाळी काँग्रेस नेते रणदिप सुरजेवाला यांनी सचिन पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांनीही विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या घरी झालेल्या या बैठकीला किती आमदार उपस्थित होते याची अधिकृत माहिती बाहेर आली नसली तरी या बैठकीला १०६ आमदार उपस्थित असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पद नाकारल्यानंतर ते नाराज होते त्यांची समजूत काढण्यासाठी  काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहूल गांधी हे त्यांच्या संपर्कात होते असंही पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.