नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ ची साथ दीर्घ काळ सुरू राहण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

जगभरात  कोरोनाच्या  साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्याला सहा महिने पूर्ण झाले. त्यानंतर या साथीच्या सध्याच्या स्थितीचा आढावा संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर WHO नं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे.

कोरोनाच्या साथीमुळे अनेक देशांना सामाजिक-आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागेल, असाही इशारा या निवेदनात दिला आहे. WHO नं 30 जानेवारीला कोरोना ही जागतिक आरोग्य समस्या असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं, तेव्हापासूनची या समितीची ही चौथी बैठक होती.