मुंबई : दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती व दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार योजनेकरिता दि. 10 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त (मुंबई शहर) यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींकरिता कार्य करणाऱ्या संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याची योजना राबविली जाते.

या पुरस्कार योजनेचा तपशील व त्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्याwww.disabilityaffairs.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांचे कार्यालयामध्ये दि. 31 जुलै 2019 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

अर्जदाराकडून योग्य त्या कागदपत्रांसह 4 प्रतींमध्ये परिपूर्ण अर्ज 10 ऑगस्ट पर्यंत स्वीकारण्यात येतील. प्रत्येक अर्जदारांनी त्यांच्या कार्याविषयी इंग्रजी भाषेमध्ये 150 ते 200 शब्दांमध्ये संक्षिप्त माहिती प्रस्तावासह जोडावी. या कार्यालयात दि. 10 ऑगस्ट 2019 नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही.