नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्यासाठी बिहार राज्य सरकारनं केलेली शिफारस स्विकारली असल्याचं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं.

या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पटना इथं गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबईत वर्ग करावा यासाठी रिया चर्कवर्ती हीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीनं सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला ही माहिती दिली.

सुशांत याच्या आत्महत्येविषयीचं सत्य समोर यायला हवं असं मत न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या पीठानं यावेळी नोंदवलं.