एनएफएसए लाभार्थ्यांसाठीच्या एप्रिल-जून 2020 च्या निर्धारीत अन्नधान्याचे राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडून 93.5 % वितरण : भारतीय अन्नधान्य महामंडळ

नवी दिल्ली : भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून प्राप्त अहवालानुसार, सुमारे 118 लाख मेट्रीक टन (99%) जे एप्रिल-जून 2020 साठी निर्धारीत होते, ते राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून उचलण्यात आले आहे आणि एनएफएसएच्या लाभार्थ्यांसाठी मोफत वितरीत करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, आणखी 111.52 लाख मेट्रीक टन (93.5%) राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून एप्रिल-जून 2020 साठी वितरीत करण्यात आले आहे. 37.5 लाख मेट्रीक टन (94%) अन्नधान्य एप्रिल आणि मे 2020 मध्ये सुमारे 75 कोटी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे आणि 36.54 लाख मेट्रीक टन (92%) अन्नधान्य जून महिन्यात 73 कोटी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे.

मार्च 2020 मध्ये जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) नूसार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची (पीएम-जीकेएवाय)” एप्रिल, मे आणि जून 2020 या तीन महिन्यांमध्ये अंमलबजावणी केली, जेणेकरुन देशात निर्माण झालेल्या कोविड-19 संकट परिस्थितीत एनएफएसए अंतर्गत गरीब आणि वंचित लाभार्थ्यांना अन्नधान्याची झळ बसू नये.

या विशेष योजनेअंतर्गत, सुमारे 81 कोटी एनएफएस लाभार्थ्यांचा अंत्योदय अन्न योजना (एएवाय) आणि प्रायोरेटी हाऊसहोल्डर्स (पीएचएच) या दोन्ही श्रेणीत समावेश करुन त्यांना अतिरिक्त मोफत अन्नधान्य (तांदूळ/गहू), प्रतीमाह प्रतीव्यक्ती 5 किलो, त्यांच्या नियमित मासिक पात्रतेपेक्षा अधिक पुरवण्यात आले.

30 मार्च 2020 रोजी, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने राज्ये/केंद्रशासित प्रदेशवार वितरणासाठी 121 लाख मेट्रीक टन (सुमारे 40 लाख मेट्रीक टन प्रतीमाह) राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील एनएफएसए लाभार्थ्यांना एप्रिल-जून 2020 या तीन महिन्यांसाठी पहिल्या टप्प्यात वितरीत करण्यासाठी देण्यात आले.