????????????????????????????????????

पिंपरी : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती देणा-या क्रांतिवीरांना क्रांतीदिनानिमित्त चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर बंधूच्या पुतळयास, चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके तसेच दापोडी येथील शहिद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

चिंचवडगांव येथे झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य सुरेश भोईर, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके येथे झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम. शिंदे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

दापोडी येथील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे येथे झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य राजू बनसोडे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, हुतात्मा नारायण दाभाडे यांचे नातू धनंजय दाभाडे, सुरेश दाभाडे, सरोज दाभाडे, नाना वानखेडे, राजेंद्र, सुर्यकांत खोल्लम आदी उपस्थित होते.