नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय उपचारांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा देशाच्या विविध भागात करण्याच्या कामी भारतीय रेल्वे सातत्याने कार्यरत आहे. आतापर्यंत एक हजार ८१४ टँकर्सद्वारे ३१ हजार मेट्रीक टन द्रवरुप प्राणवायूचा पुरवठा ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांनी १५ राज्यांमध्ये केला आहे.

४४० ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांनी प्रवास पूर्ण केला असून एक गाडी सध्या प्रवासात आहे. या गाडीत ६ टँकर्समधून ११४ मेट्रीक टन प्राणवायू भरलेला आहे.