नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदुस्तानी शास्त्रीय संगितातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं हृदयविकारानं निधन झाल्यासंबंधीचं वृत्त त्यांच्या नजीकच्या कुटुंबियांकडून देण्यात आलं आहे. मृत्यूसमयी पंडित जसराज अमेरिकेत न्यू जर्सी इथं होते. तिथेच राहत्या घरी स्थानिक वेळेनुसार पहाटे सव्वापाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मेवाती घराण्याचे गायक पंडित जसराज यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला वेगळा आयाम दिला. केंद्रशासनानं पद्मविभूषण पुरस्कार, तर राज्यशासनानं पंडित भिमसेन जोशी गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या संगित कलेचा गौरव केला आहे.