नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय दूरसंचार आणि माहिती- तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना पत्र पाठवून भिन्न स्वरुपाचे विचार योग्यरीत्या मांडले जावेत यासाठी विशिष्ट देशनिहाय समुहांसाठी मार्गदर्शक सुचना तयार कराव्यात असं त्यात म्हटलं आहे.

सन २०१९ मध्ये भारतात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात फेसबुकच्या भारतीय व्यवस्थापनाच्या एकांगी भूमिकेबद्दल प्रसाद यांनी या पत्रात गंभीर आक्षेप व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या काळात फेसबुक इंडियानं केंद्राच्या विचारधारेला पाठिंबा दर्शवणाऱ्या पोस्ट आणि पेजेस लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात आले, असं प्रसाद यांनी काही उदाहरणं देऊन नमूद केलं आहे.