नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ९५ टक्के स्थलांतरित कामगारांना मोफत धान्यपुरवठा करण्यात आला असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. कोविड-१९ च्या पार्श्र्वभूमीवर केंद्र सरकारनं देशभरातील कष्टकरी वर्गाला मदत म्हणून मे महिन्यात आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत विविध आर्थिक उपाययोजनांची घोषणा केली होती.

त्याअंतर्गत ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकंदर दोन लाख ६५ हजार टन धान्य वितरित करण्यात आलं आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिली आहे.