नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा १० टक्क्यानं वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय विधी मंत्रालयानं यासंदर्भातली अधिसूचना आज जारी केली.

कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे उमेदवारांना प्रचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, हे गृहित धरून, निवडणुक आयोगानं याबाबतची शिफारस केंद्र सरकारला केली होती. याआधी प्रत्येक उमेदवाराला लोकसभेसाठी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा होती, या निर्णयामुळे ही मर्यादा वाढून ७७ लाख रुपये होणार आहे.