मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना टाळेबंदी टप्प्याटप्प्यानं शिथिल होत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आता कोयना येथील पर्यटक निवास सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वीच एमटीडीसीनं पुणे विभागातील महाबळेश्वर, माथेरान, कार्ला, पानशेत, भिमाशंकर, माळशेज घाट इथली रिसॉर्ट सुरू केली आहेत. डिसेंबरमध्ये कोयना येथील रिसॉर्ट सुरू होत असून, पर्यटकांनीही पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन एमटीडीसीने केले आहे.

महामंडळाच्या सर्वच रिसार्टमध्ये कोरोनाबाबत योग्य ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. संपुर्ण रिसॉटचे र्सॅनिटायझेशन, मास्क,

सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझर स्प्रे, शरीराचे तापमान मोजण्याची यंत्रणा, ऑक्सीमीटर तसेच अत्यावश्यक मेडीकल सुविधेसाठी जवळच्या डॉक्टरांशी संपर्काची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.