नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक विभागानं आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

मात्र या कालावधीत ठराविक मार्गांवरील नियोजित उड्डाणांना परवानगी देण्यात येणार असल्याचं मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

गेल्या २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली होती.

त्यानंतर केंद्र सरकारनं २५ मे पासून केवळ देशांतर्गत उड्डाणांना काही नियमांसह परवानगी दिली आहे.