मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबई महानगरपालिकेत कोविड रूग्ण संपर्क शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चुकीच्या नोंदींविषयी निष्पक्ष चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलं आहे.
या मोहिमेदरम्यान केवळ एका सदस्याची चाचणी झालेली असतानाही, घरातल्या इतर सदस्यांचीही चाचणी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीला आला होता. यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आयुक्त बांगर यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली होती.