मुंबई (वृत्तसंस्था) : दिल्ली, गोवा, गुजरात आणि राज्यस्थानमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करता यावी यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनानं स्वतंत्र क्षेत्राची व्यवस्था केली आहे. प्रवासी विमानतळाबाहेर जाण्यापूर्वी त्यांना या क्षेत्रात नेलं जाईल आणि तीथे त्यांची कोरोनाविषयक आरटीपीसीआर चाचणी केली जाणार असल्याचं विमानतळ व्यवस्थापनानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.