नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१ मध्ये होणाऱ्या जे ई ई आणि नीट प्रवेश परीक्षांसाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं अभ्यासक्रम तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
मंत्रालयाच्या विविध योजना आणि कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी काल आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी हे आदेश दिले.
या बैठकीला शिक्षण विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. येत्या वर्षात सर्व विशेषतः अभियांत्रिकी विषयतील शिक्षण मातृभाषेतून असावं, असा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.