मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आज आत्महत्या केली. चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन येथे त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
डॉ. शीतल यांना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.