नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गैरसमज न बाळगण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. या कायद्यांच्या विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जावडकेर यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून हे आवाहन केले.

पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक धान्य बाजार समित्यांमध्ये किमान आधारभूम किमतीत विकले, असे नमूद करत जावडेकर यांनी, या कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमत आणि बाजार समित्या अबाधित राहणार असल्याचे स्पष्ट केले.