मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात रब्बीच्या काळात सिंचन व्यवस्था सुरळीत असावी यासाठी शेतकऱ्यांना नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलून द्यावीत असे निर्देश ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिले आहेत. राऊत यांनी काल मुंबईत महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. रोहित्रांसाठी तातडीनं तेलाचा पुरवठा करावा अशी सूचना त्यांनी केली.

रोहित्रे नादुरुस्त होण्याची कारणं शोधून, त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसंच कारणांसंबंधीचा अहवाल ३१ डिसेंबरपर्यंत सादर करावा, असे निर्देशही राऊत यांनी दिले.

वीज पुरवठ्याचं जाळ उभं करण्यासाठी वन विभागाच्या परवानगीसाठी पाठपुरावा करावा, कमी दाबानं वीज पुरवठा होत असलेल्या भागात उपकेंद्रांची उभारणी करावी, अशा सूचनाही राऊत यांनी या बैठकीत केल्या.