मुंबई (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन होणार आहे. त्याबरोबरच यूट्यूब, फेसबूक आणि ट्विटर वरुनही हा कार्यक्रम घरबसल्या पाहता येईल.

त्यामुळे लोकांनी चैत्यभूमीवर जमू नये, असं आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चैत्यभूमी येथे जाऊन बाबासाहेबांच्या स्मारकास विनम्र अभिवादन केलं आहे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते काल दादरच्या चैत्यभूमी इथं करण्यात आलं.