नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात ,कोरोनावरची पहिली लस देण्यात येईल असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे. ही लस देताना तज्ञांशी चर्चा करून पहिल्या टप्प्यात  ३० कोटी नागरिकांची निव़ड करण्यात आली असून; यात पोलीस, लष्कर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लशींची सुरक्षितता आणि परिणामकारकतेला आपलं प्राधान्य असून याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही ते म्हणाले. दरम्यान भारतात दिली जाणारी कोरोनाची लस ही जगातील इतर देशांनी तयार केलेल्या लशींइतकीच प्रभावी असेल , अशी ग्वाही आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. लस घेतल्यानंतर सौम्य ताप आणि लस दिलेल्या ठिकाणी वेदना;  असे त्रास होण्याची शक्यता आहे, मात्र हे सर्वच लशींच्या बाबतीत घडतं. लशीकरणाच्या मोहिमेत या परिणामांचा सामना करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व राज्य सरकारांना देण्यात आल्याचंही , आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे