नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवसाच्या कामाचा आढावा घेतला.

लसींबाबत अफवा किंवा चुकीची माहिती पसरवण्याच्या प्रकारांना आळा घालावा, तसेच लसींबाबतची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी केले.

लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशीच्या कामातली प्रगती आणि यादिवशी निर्धारित लक्ष्यानुसार झालेल्या लसीकरणाची माहिती राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी हर्षवर्धन यांना दिली. तसेच लस देण्याच्यावेळी लाभार्थींचा तपशील अपलोड होण्यात आलेल्या काही किरकोळ तांत्रिक अडचणींचीही त्यांनी माहिती दिली.

संपूर्ण देशभरातील नागरिकांनी लसींवर विश्वास दाखवला असल्याचेही त्यांनी नमूद केलं.