नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक येत्या मार्चपासून पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या नोटा बंद करणार असल्याचे वृत्त निराधार असून, ही अफवा असल्याचे पीआयबी प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचे पीआयबीने म्हटले आहे.