नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सामूहिकता हीच भारताची शक्ती आहे, आणि तोच आत्मनिर्भर भारताचा मूलाधार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात उत्तर प्रदेशात चौरी चौरा इथं झालेल्या हत्याकांडाला आज शंभर वर्षे पूर्ण झाली.

या घटनेच्या शताब्दी समारंभाचं मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. या घटनेतल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम विद्यार्थ्यांनी करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

कृषिक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं अनेक ठोस निर्णय घेतले आहेत, शेतकऱ्यांना आणखी  एक हजारपेक्षा अधिक कृषी बाजारपेठांसोबत जोडलं जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कृषिमाल कुठेही विकता येईल, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी एका विशेष टपालाचं प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते झालं.