A traffic policeman walks in a road on the deserted Durbar Marga in Kathmandu as a lockdown is imposed to contain the coronavirus disease (COVID-19) in Nepal, on March 24, 2020. Photo: Suresh Chaudhary/THT

मुंबई (वृत्तसंस्था) : अकोला जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पुढचा आदेश येईपर्यंत दर रविवारी संपूर्ण संचारबंदी तसंच दररोज रात्रीची संचारबंदी, वाहनांतून प्रवास करतांना वाहनातील प्रवाशी संख्येवर मर्यादा, गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन इत्यादी बाबींवर जोर दिला आहे.

यासंदर्भात काल संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार दर शनिवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण अकोला जिल्ह्यात संचारबंदी लागू राहील. यातून अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठा आणि व्यवहार दर शनिवारी रात्री ८ पासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे.

त्यानुसार या कालावधीत वैद्यकीय आणि जीवनावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे बाजार, दुकानं, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स. चहा-नाश्ता उपाहारगृहं, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, पानटपरी, इतर वस्तूंची दुकानं बंद राहणार आहेत.

सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खासगी बसेस, खासगी वाहतूक, पालिकेची बससेवा, रिक्षा सेवा बंद राहील. आपतकालीन स्थितीत आणि रुग्णसेवेसाठी रिक्षा किंवा स्वत:चं वाहन वापरता येईल. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालमोटारींना परवानगी आहे.अनावश्यक कारणासाठी चारचाकी किंवा दुचाकीहून फिरणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे.