नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी द्रवरूप ऑक्सिजन केवळ वैद्यकीय कारणासाठी वापरला जाईल याची खातरजमा करावी असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.

ज्या नऊ उद्योगांना अपवाद करण्यात आलं होतं तेही उद्योग ऑक्सिजन जास्तीत उपलब्ध व्हावा या कारणानं वगळण्यात आले आहेत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी याबाबत राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. भल्ला यांनी सर्व उत्पादकांना द्रव ऑक्सिजनचे उत्पादन जास्तीत जास्त करावे आणि पुढील आदेश येईपर्यंत तातडीने वैद्यकीय वापरासाठी सरकारला उपलब्ध करुन देण्यास सांगितलं आहे.