नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमतीत गेल्या वर्षभरात २ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ झाली. भारतीय रिझर्व बँकेने २०२०- २१ या आर्थिक वर्षातल्या गेल्या तिमाहीचा घर किंमत निर्देशांक काल प्रसिद्ध केला. गृहनिर्माण निबंधकांकडून उपलब्ध झालेल्या माहितीवर हा निर्देशांक आधारित आहे. मुंबई खेरीज अहमदाबाद, बेंगळुरु, दिल्ली, चेन्नई, जयपूर, कानपूर, कोची, कोलकाता, आणि लखनौ या शहरांची माहिती यात समाविष्ट आहे. २०१९-२० या वर्षात घरांच्या किमतीत ३ पूर्णांक ९ दशांश टक्के वाढ झाली होती. दिल्ली, बेंगळुरु कोलकाता आणि जयपूर मध्ये घरांच्या किमती दोन दशांश टक्क्यांनी कमी झाल्या, मात्र इतर ६ शहरांमध्ये वाढल्या असे या आकडेवारीत म्हटले आहे.