नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केंद्रसरकारच्या कोविड व्यवस्थापनाबाबत एक श्वेत पत्रिका प्रसिद्ध केली. या श्वेतपत्रिकेचा उद्देश सरकारला दोष देण्याचा नसून कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी देशाला तयार राहण्यात सहाय्य व्हावे हा आहे, असे त्यांनी सांगितले. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या काळात व्यवस्थापन गरजेनुसार नव्हते, असे ते म्हणाले. मात्र काल एकाच दिवशी विक्रमी संख्येने झालेल्या लसीकरणाचं त्यांनी कौतुक केले. सरकारने चागले काम केले आहे, आणि सर्व लोकांचे लसीकरण होईपर्यंत ते अशाच प्रकारे चालू राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.